मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट जारी
मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वॉरंट जारी करण्यात आले आहे. छट पूजेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर वर वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य कोर्टाने 18 फेब्रुवारी ला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईचे स्थानिक अंखुरी अंजनी कुमार यांनी राज ठाकरे विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर वॉरंट जारी केलं. रांची न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम फिरामनी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट जारी केले.
राज ठाकरे बोलताना म्हणाले कि, छट पूजेच हे नवीन नाटक कुठून आलं? महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृती सोबतच तुम्हाला राहावे लागेल. अस वक्तव्य राज ठाकरे यांनी बोलताना केलं होत
छट पूजा काय आहे थोडक्यात
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली सुर्यादेवतेची पूजा असते, छट पूजा हि संपूर्ण वर्षात चैत्र मासात आणि कार्तिक मासात अशा प्रकारे दोन वेळा करण्यात येते.
Tags:
Breaking News