आता जमिनीत नाही तर हवेत येणार बटाट्याला बटाटे




आता जमिनीत नाही तर हवेत येणार बटाट्याला बटाटे

                जमिनीखाली बटाट्यांचे उत्पादन होत असते  हे सगळ्यांनाच माहिती आहे . मात्र , हरियाणात आता  हवेत बटाटे उगवतील  आणि त्यांचे उत्पादनही सुमारे १० ते १२ पटीने अधिक होईल . हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील आलू प्रौद्योगिकी केंद्र येथे या तंत्रावरील काम पूर्ण करण्यात आले आहे . एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांना देण्यासाठी या बटाट्याच्या बिजाचे काम सुरू होईल . या तंत्राचे नाव ' एरोपोनिक ' असे आहे . त्यामध्ये जमीन किंवा मातीच्या मदतीशिवायच हवेत बटाट्याचे उत्पादन घेता येऊ शकेल .


                त्यामध्ये मोठ्या पेट्यांमध्ये बटाट्याच्या रोपांना लटकवले जाते . त्यामध्ये गरजेनुसार पाणी आणि पोषक घटक टाकले जातात . करनालच्या शामगढ गावातील केंद्राचे अधिकारी डॉ . सतेंद्र यादव यांनी याबाबतची माहिती दिली . या केंद्राचा इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरशी एक करार झाल्याचे त्यांनी सांगितले . त्यानंतर भारत सरकारद्वारा एरोपोनिक तंत्राच्या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली . बटाट्याचे बीज उत्पादनासाठी इतर वेळी आम्ही ग्रीन हाऊस तंत्राचा वापर करीत होतो . त्यामध्ये उत्पादन ' अतिशय कमी होत होते . एका रोपापासून पाच छोटे बटाटे मिळत होते ज्यांना शेतकरी शेतात पेरत होता . त्यानंतर मातीशिवाय कॉकपिटमध्ये बटाटा बीज उत्पादन सुरू करण्यात आले . त्यामध्ये उत्पादन सुमारे दुप्पटीने वाढले . आता एक पाऊल आणखी पुढे टाकून एरोपोनिक बटाट्याचे उत्पादन केले जाईल . त्यामध्ये माती किंवा जमिनीशिवाय बटाटे येतील व एक रोप ४० ते ६० छोटे बटाटे देईल .


Post a Comment

Previous Post Next Post