भगवद्गीतेतील या श्लोकाचा अर्थ खूपच महान आहे
जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥
खोट्या देहाभिमानाच्या नादी लागुन आपण आपला घात करुन घेत असतो . ज्याने स्वतः स्वत : ला जिंकले तो स्वतः स्वत : चा मित्र होय , पण ज्याचा स्वत : वर ताबा नाही तो स्वत : स्वत : चाच शत्रू होतो . विचारपूर्वक देहाचा अहंकार सोडावा , आणि ब्रह्मरुप व्हावे . म्हणजे आपणच आपले कल्याण केले. नाहीतर शरीराच्या सौंदर्याला भुलून त्यातच आत्मबुद्धी ठेवतो , तो कोशातील रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वत : भोवती पाश निर्माण करुन स्वत : च स्वत : चा शत्रू होतो . द्रव्यप्राप्तीची संधी आली की , दुर्देवी माणसाला आंधळेपणाचे डोहाळे लागतात पहा ! पुढे आलेला द्रव्यसाठा उघडला असता आपले असलेले डोळे आपणच बांधून टाकतो . आणि तो सांठा ओलांडून पुढे जातो . किंवा कोणी एक मनुष्य वेड लागल्यामळे . मी पुर्वीचा नाही. मी चोरला गेलो आहे . असे म्हणतो व अशाप्रकारचा खोटा ध्यास मनात घेऊन बसतो .वास्तविक हल्ली जो तो आहे , तो पूर्वीचाच आहे , परंतु त्याच्या बुद्धीला तसे पटत नाही . स्वप्नातील तलवारीच्या प्रहाराने खरोखर कोणी मरतो काय ? जेव्हा पोपटाच्या अंगच्या वजनाने ( त्याला पकडण्यासाठी ठेवलेली ) नळी उलटी फिरते . तेंव्हा त्याचे तोंड फिरते . तिच संधी असते की , त्याला उडून जाऊन मुक्त होता येते . परंतु आपण खाली पडू म्हणून तो ती नळी घट्ट धरुन ठेवतो . उगीचच मान वाकडी करतो , अंगाचा संकोच करुन छाती आवळतो आणि पायाच्या पंजात नळीधरुन राहतो . मी खरोखरच बांधला गेलो आहे , या भावनेने तो खोड्यात सापडतो आणि मोकळ्या असलेल्या पायाचा चवडा ( त्या नळीत ) अधिकच गुंतवून टाकतो . मग तो जरी अर्धा कापून नेला तरी ती नळी सोडीत नाही . म्हणून आपण आपला अहंकार वाढविला आहे ,त्यामुळे आपला आपणच शत्रु होय .
Tags:
Entertainment