
बुलंदशहर: उत्तर प्रदेशात असलेल्या बुलंदशहरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला चालू कार मध्ये बसवून बलात्कार केला. तसेच आरोपींनी मोबाईलवर या घटनेचा व्हिडीओहि बनविला आहे. घटनेनंतर पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकि देत रस्त्याच्या कडेला फेकून आरोपी फरार झाले.
अल्पवयीन पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. ज्या गाडीत हि घटना घडली ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. हि घटना बुलंदशहराच्या खानपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली. तसेच घटनेतील एका आरोपीला अटक केली असून दुसर्या आरोपीस पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत.