बच्चू कडू यांचा महत्वाचा जीवन प्रवास - एकदा नक्की वाचा


              महाराष्ट्रातील युवकांचे आवडते नेते म्हणजे बच्चुभाऊ. महाराष्ट्रात बच्चू कडू यांच्या समर्थकांची संख्या लाखोंनी आहे. त्यांचे संपूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू असे आहे. ते महाराष्ट्रातील राजकारणी व्यक्ती आहेत तसेच ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत
(An important life journey of a Bachhu Kadu)

बालपण
बच्चू कडू यांचा जन्म ५ जुलै १९७० रोजी झाला. ते बेलोरा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती या गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात राहणारे आहेत. त्यांच्या आईचे नाव इंदिरा कडू असे आहे व त्यांच्या वडिलांचे नाव बाबाराव कडू असे आहे. बच्चु भाऊ यांना सहा भाऊ आणि पाच बहिणी आहेत  बच्चु भाऊ हे  दहाव्ये अपत्ये आहेत. बच्चु भाऊ यांचे पूर्वज अमरावतीच्या वाईकी गावातील होते. त्यांचे कुटुंब पूर्वी पासून दुग्ध व्यवसाय करत होते.

शिक्षण
बच्चू कडू यांचे प्राथमिक शाळेतील शिक्षण त्यांच्या बेलोरा गावात झाले.  त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी चांदूरबाजार येथील महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांचे शिक्षण वाणिज्य शाखेतून झालेले आहे. उत्तम संस्कार त्याचबरोबर समाजसेवेची तसेच रुग्ण सेवेची आवड याच काळात जोपासली गेली

राजकीय प्रवास
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत पुढाकार घेत. येथूनच त्यांना पुढं प्रतिनिधीत्व करण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी कॉलेज प्रतिनिधी निवडणुकीत भाग घेतला आणि ते निवडून देखील आले, त्यांची राजकीय  उत्स्फूर्तता व आवड वाढत गेली. ते हळूहळू लोकप्रिय होत गेले.  त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला 

विविध उपक्रम
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, गरजूंना मदत करणे, समाजातील चुकीच्या गोष्टीना आळा घालणे, आशा प्रकारची कामे ते करत आहेत. चांगली नेतृत्वक्षमता आपल्याला नेहमी यश्याच्या शिखरावर घेऊन जाते. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून दिसून येत आहे. जनतेच्या विविध प्रश्नांचे सोडवणूक करणे हे त्यांचे महत्वाचे कार्य आहे. बच्चू कडू अपंग अंध व्यक्तींसाठी खूप चांगल्या प्रकारचे कार्य करत आहेत. नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणास्तव त्यांचे चांगले गुण आपणास पाहायला मिळतात. त्यांचा रुग्ण सेवा सर्वात आवडीचा विषय आहे. गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते सतत दक्ष असतात.


Post a Comment

Previous Post Next Post