पुणे: भांडणाचा राग मनात धरून झोपलेल्या तरुणावर कुर्हाडीने वार करून खून करण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता भवानी पेठ येथे घडला. भवानी पेठ येथे राहणारा आदिब व त्याचा मोठा भाऊ या दोघांमध्ये भांडण चालू होते. हे भांडण चालू असताना शेजारी राहणारे ऋषभ यांचे वडील भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी ऋषीच्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली. ऋषभ यांनायाप्रकराचा खुप राग आला होता. या रागातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले. ऋषभ यानी एका साथीदाराच्या मदतीने लोखंडाच्या रॉडने आधी त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. या दोघांवर खडक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.