पत्रकार चौकात टँकर खाली चिरडून एकाचा मृत्यू



अहमदनगर: नगर शहरात जड वाहतुकीला बंदी असतानाही शहरातून अनेक वाहने जात आहेत. या जड वाहनांमुळे शहरांमध्ये कायमच मोठी गर्दी होत असते. व दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्रकार चौकामध्ये एक टॅंकर दुचाकी वरून गेल्याने दुचाकी चालकाचा चिरडून मृत्यू झाला आहे. गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता दुचाकी ही कमलेश पटवा नावाच्या व्यक्तीची आहे. तरी अपघातात नेमके मरण पावले कोण याची ओळख पटली नाही. पुढील शोध अहमदनगरचे पोलीस घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post