पुणे: मंगळवार पासून शिवाजीनगर एसटी महामंडळाचे बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित होत असल्याने आता शिवाजीनगर चे बस्थानक बंद राहणार आहे. शिवाजीनगर बस स्थानकापासून मेट्रोचे काम चालू होणार असल्याने शिवाजीनगर बस स्थानक स्थलांतरित करण्यात आले आहे. काही महिन्यापासूनच बस स्थानक हे वाकडेवाडी कडे स्थलांतरित करण्याचे ठरले होते. तरी काही अडचणीमुळे हे स्थलांतर रखडले होते. अखेर मंगळवारपासून आता वाकडेवाडी चे बस स्थानक चालू होणार आहे. वाकडेवाडी येथे एकूण एकोणीस फलाट उभारण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शिवाजीनगर बस स्थानक येथून वाकडेवाडी कडे जाण्यासाठी प्रवाशांची व्यवस्था लावण्यात आल्याची महामंडळाने सांगितले आहे. शिवाजीनगर येथून सुमारे चौदाशे बसेस दररोज ये-जा करत असतात. सध्या याठिकाणी मेट्रोचे काम चालू होणार असल्यामुळे स्थानक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या पुलाखाली हे शिवाजी नगरचे एसटी महामंडळाचे स्थानक करण्यात येईल. शिवाजी नगर बस स्थानक स्थलांतरित केल्यामुळे बरेचसे प्रवाशांची गैरसोय होणारच आहे. शिवाजीनगर बस स्थानक कसेतरी पीएमटीचे बस स्थानक असल्यामुळे प्रवाशांना ये जा करणे सोपे होते. आता बस स्थानक हलवल्यामुळे बरेचसे प्रवाशांची गैरसोय होणार असून याठिकाणी असणाऱ्या छोट्या व्यवसायांची ही गैरसोय होणार आहे. तसेच मोठा वळसा घालून शिवाजीनगर ते वाकडेवाडी अंतर पार करावे लागणार असल्याने मंडळ कर्मचार्यांची ही गैरसोय होण्याची शक्यता आहे.