थंडपेय मधून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार


मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत संशयीत बाळू जाधव यांनी पीडितेला पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये नेले. थंड पिया मधून गुंगीचे औषध देऊन पीडितेला बेशुद्ध केले व पीडीते सोबत दुष्कर्म केले. व याचा व्हिडिओ काढून मोबाईल मध्ये ठेवला. शुद्धीवर आल्यावर पीडितेला सर्व प्रकार लक्षात आला. याबद्दल जाब विचारला असता बाळू जाधव यांनी पीडितेला झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ काढून ठेवला असल्याचे सांगितले व वेळोवेळी पीडितेला ब्लॅकमेल करून जवळपासच्या हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आरोपीने पिढीकडून वारंवार पैसे घेतले. तसेच मानसिक व शारीरिक खेळ करत तुझा संसार मोडून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. आरोपीकडून होणाऱ्या छळास कंटाळून पीडितेने झालेला प्रकार घरी सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेला धीर देत पोलिसात तक्रार दाखल केली. संशयिताच्या विरोधात पोलिसां त फसवणूक व बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post