यूएसबी कंडोम काय आहे व तो कधी वापरावा ?

सध्या आपले जीवन मोबाईलवर खूपच अवलंबून आहे. जेव्हा मोबाईलची बॅटरी संपली, तेव्हा आयुष्य संपल्यासारखे वाटू लागते. बाहेर प्रवासात असताना मोबाईलची बॅटरी संपल्यास खूप प्रॉब्लेम येतात. म्हणूनच शॉपिंग सेंटर, विमानतळ, हॉटेल, बस यामध्ये मोबाईल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट बसवली आहे. आपल्या मोबाईलचे चार्जिंग संपल्यास आपण मोबाईल या पोटला कनेक्ट करून सहज चार्जिंग करू शकतो. अशा या सार्वजनिक यूएसबी पोर्ट ला मोबाईल चार्जिंग करणे किती सुरक्षित आहे.

याचा विचार कधी केला आहे का ?सार्वजनिक ठिकाणी असलेल्या यूएसबी पोर्ट मधून आपला मोबाईल डेटा चोरी होण्याची ची शक्यता असते. ही चोरी टाळण्यासाठी यूएसबी डेटा ब्लॉकर बनवले आहे. या ब्लॉकला यूएसबी कंडोम असे नाव देण्यात आले आहे. यूएसबी कंडोमची भारतात पाचशे ते हजार रुपये पर्यंत किंमत आहे. यूएसबी कंडोम ऑनलाइनहि उपलब्ध आहे.
Previous Post Next Post