घरोघरी जाऊन भाजपा सीएए वरील गोंधळ दूर करणार.


देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत होणारा गोंधळ व निषेध लक्षात घेता भाजपाने या कायद्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी घरोघरी जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कायद्याबाबत लोकांच्या मनात जो राग गोंधळ निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी येत्या दहा दिवसात 1000 लहान-मोठे मोर्चे काढणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने  दिली आहे. भूपेंद्र यादव (भाजपा सरचिटणीस) यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत संभ्रम काँग्रेसच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरविला जात आहे. तसेच गोंधळ व खोटे बोलण्याचे राजकारण विरोधी पक्षांकडून केले जात आहे. या गोंधळाचे उत्तर देण्यासाठी आम्ही ही दहा दिवसांची मोहीम राबवणार आहोत. यामध्ये तीन कोटींहून अधिक कुटुंबाशी संपर्क केला जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post