दात घासण्यासाठी सकाळी सकाळी टूथपेस्ट चा वापर करत असतान तर सावधान

       
     सर्वजण सकाळी लवकर उठले की वेगवेगळ्या टूथपेस्ट ने दात घासणे योग्य समजतात. परंतु ही सवय शरीराला खूपच घातक ठरू शकते. टूथपेस्ट ही खूपच वेगवेगळे कन्टेन्ट वापरून बनवली जाते. त्यापैकी एक कन्टेन्ट सोडियम लेरोल सल्फेट हा शरीराला खूपच घातक आहे. शक्यतो हा कन्टेन्ट फेस होणाऱ्या गोष्टींमध्ये वापरला जातो. उदाहरणार्थ साबण, निरमा पावडर, हार्पिक इत्यादी. या घटकाचा उपयोग केवळ फेस करण्यासाठी होतो. पोटात गेल्यास शरीराला घातकही ठरू शकतो. तज्ञांच्या मते या घटकांमुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो. याला पर्याय म्हणून टूथपेस्टचा वापर करणे शक्यतो टाळावे. 
       मग दात घासण्यासाठी वापरावे तरी काय? सकाळी सकाळी दात घासण्यासाठी लिंबाच्या काडी चा उपयोग किंवा आंब्याच्या काडीचा तसेच पेरू च्या काड्या चा उपयोग सुद्धा करू शकता. जर यापैकी काही न मिळाल्यास त्यांच्या पानांचा सुद्धा दात घासण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे राख, लवंग व मीठ यांचे एकत्र मिश्रण करून दररोज सकाळी व संध्याकाळी दात घातल्यास दातही स्वच्छ निघतात व शरीराला कसलाही धोका होत नाही. तसेच या मिश्रणापासून दात दुखी सुद्धा थांबते त्याचबरोबर तोंडाचा घाण वास येणे सुद्धा कमी होते, त्याचबरोबर किडलेले दात सुद्धा लवकरात लवकर नीट होण्यास मदत होते.

   वेगवेगळ्या टूथपेस्ट वरती प्रिक्वेशन मध्ये सरळ सरळ दिले असते, की ही टुथपेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी तसेच सहा वर्षाखालील लहान मुलांना ही वापरासाठी देऊ नये आणि टूथपेस्ट गिळली गेल्यास दवाखान्यात जावे. अशी घातक गोष्ट असूनही सर्रास प्रत्येक घराघरात टूथपेस्ट वापरली जाते.

Post a Comment

Previous Post Next Post