भद्रावती येथून नागपूर कडे जाणाऱ्या बस मध्ये ही चोरीची घटना घडली. बस मध्ये खूपच गर्दी असल्यामुळे महिलेला तिकीट काढणे शक्य झाले नाही. ही वराळ जवळ आल्यावर महिलेने तिकीट काढण्यासाठी स्वतःचे पाकीट बघितले असता आठ तोळे सोने व तीन हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचे कळले.
बस वाहकाने ताबडतोब बस वराळ पोलीस स्टेशनला नेली. तिथे चौकशी केली असता कुणाकडेही चोरीचा माल सापडला नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
बस वाहकाने ताबडतोब बस वराळ पोलीस स्टेशनला नेली. तिथे चौकशी केली असता कुणाकडेही चोरीचा माल सापडला नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.