टायफाईड ला मराठीत विषमज्वर असेही म्हणतात. टायफाईड हा सालमोनेला टायफी या जीवानुचा संसर्ग झाल्यावर होतो. सालमोनेला टायफी हा जिवाणू रुग्णाच्या विष्ठा व मूत्र यामधून बाहेर पसरत असतात. काही वेळा टायफाईड बरा झालेला रुग्ण सुद्धा या जिवाणूंचा वाहक असू शकतो. सौचनंतर हात स्वच्छ न धुणे हे टायफाइड होण्याचे कारण आहे. काही वेळा उघड्यावर शौच केलेली असेल तर या सौच वरील माशा अन्नावर जाऊन बसतात व टायफाईड चा संसर्ग होतो. दरवर्षी सुमारे 1 कोटी 60 लाख व्यक्ती टाइफाइड या आजाराने आजारी पडतात.
टायफाईड आजाराची लक्षणे-
टायफाईड आजाराची लक्षणे दिसण्यास किमान दहा ते चौदा दिवस लागतात. टायफाईड लक्षणांमध्ये प्रमुख्याने अशक्तपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, थंडी वाजून ताप येणे, कळ लागणे, पोट दुखणे, सांधेदुखी, मलावरोध इत्यादी लक्षणे जाणवतात. टायफाईड सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे छातीवर व पोटावर लालसर पुरळ येणे. रुग्णास उपचार पद्धती लवकर न मिळाल्यास मेंदूमध्ये जीवाणूंचा संसर्ग होऊन कोमा व मृत्यूमुखी पडण्याची दाट शक्यता असते.
-टायफाईड आजारावर ती घरगुती उपचार पद्धती-
१) दिवसातून दोन वेळा लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्या ने टायफाईड बरा होण्यास मदत होते.
2) एक कपभर पाण्यात तुळशीची पाणी व आले उकलून घ्या व दिवसातून दोन ते तीन वेळा प्या
३) टायफाईड वर लवंग सुद्धा असरदार आहे. लवंग चा काढा करून घेतल्याने टायफाईड आजारावर लवकरात लवकर आराम पडतो.
४) एक कपभरं ताकात दोन चमचे धनी मिसळून घेऊ शकता
५) टायफाईड झाल्यावर भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्याने टाइफाइडचे जिवाणू लघवीवाटे निघून जातील.
श्री अभिजीत बनकर
Tags:
Health