मलेरिया रोगाची लक्षणे व घरगुती आयुर्वेदिक उपचार


मलेरिया हा रोग डासांच्या चावण्यामुळे होतो. मलेरिया हा प्लाझमोडियम वायवॅक्स नावाच्या परजीवी मुळे डासं द्वारे होतो. मलेरिया हा रोग खूपच प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात हिप्पोक्रॅटीस यांना मलेरिया हा आजार माहीत होता. युरोपमध्ये जेव्हा मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती, तेव्हा मलेरिया वरती सिंकोना वनस्पतीचा उपचार करण्यात येत होता.
-मलेरिया आजाराची लक्षणे-
1) मलेरिया झाल्यावर प्रथम थंडी वाजून ताप येतो तसा ताप थोडा वेळ टिकतो
2) ताप कमी होताना घाम येतो 
3) शक्यतो ताप दिवसाआड किंवा रोज येतो.
4) मलेरिया झालेल्या व्यक्तीस डोकेदुखी, अंगदुखी  ही लक्षणे जाणवतात. 
5) काहीवेळा रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीद्वारे लाल रक्तपेशी दिसतात.
मलेरिया वरती घरगुती उपचार पद्धती
1) गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास फायदा होतो.
2) एक चमचा दालचिनी, एक चमचा मध व अर्धा चमचा काळी मिरी पावडर उकळून त्याचा काढा करून घेतल्यास मलेरिया वरती चांगल्याप्रकारे फरक पडतो.
3) तुळशीच्या पानांचा काढा दिवसातून दोन ते तीन वेळेस घेतल्यास रोग्यास आराम पडण्यास मदत होते.
4) काळी मिरी सोबत कडुलिंबाची पाने पाण्यात घेतल्यास मलेरियाचा ताप कमी होतो.
श्री अभिजीत बनकर 

Post a Comment

Previous Post Next Post