अमरावती: अमरावतीत चोरांनी चक्क पोलिसाच्याच घरी चोरी करून तब्बल तीन लाख पंचवीस हजारांचा ऐवज लंपास केला. ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे घर स्वावलंबी नगरात आहे. रविवारी अशोक भोसरी हे शेवगावला देवदर्शनासाठी गेले असताना रात्री त्यांच्या घरात हा चोरीचा प्रकार घडला. देवदर्शन वरून आल्यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील सगळे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. नंतर त्यांनी आलमारी ची तपासणी केली असता चोरांनी काही सोन्याचे दागिने चोरल्याचे निदर्शनात आले. पोलिसांनी या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे.