काँग्रेस पक्षाकडून मंत्रिमंडळात पाठवण्यात येणाऱ्या नेत्यांची अंतिम यादी तयार झाली नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार हा लांबणीवर पडला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे विधान महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात होते, परंतु काँग्रेस पक्षाची यादी तयार नसल्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडलाय. तरी आता 27 किंवा 30 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विसरू शकतो. काँग्रेस पक्षाची अंतिम यादी तयार झाल्यानंतर तीनही पक्षांचे नेते फोनवरून आपसात चर्चा करून पुढील निर्णय घेतील. उद्या दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार बाबत निर्णय होऊ शकतो.