आपल्या मनातील भावना ही आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, दयाळू व्यक्ती ती अधिक आयुष्य जगू शकतात. कारण दयाळू व्यक्तींची विचार करण्याची पद्धती नेहमी सकारात्मक असते. सकारात्मकतेचा थेट संबंध आपले मन आनंदी व फ्रेश राहण्यासाठी होतो.
जे लोक एकमेकांशी दयाळू पणाने राहतात, अशा लोकांसोबत राहणे बाकीच्या लोकांना पसंत असते. याउलट रागीट लोकांसोबत मैत्री करणेदेखील अवघड वाटते. जे लोक दयाळूपणे राहतात त्यांचा स्वतःचा तनाव आपोआपच कमी होतो. यामुळे स्वतःचे चांगले आयुष्य जगण्यास मदत होते.
*दयाळू जीवन जगण्यासाठीच्या टिप्स*
एखाद्याच्या असभ्य वर्तनाबद्दल प्रेमाने प्रतिसाद द्या.
इतरांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घ्या.
स्वतःचा राग कमी करा.
समोरचा रागात बोलत असेल तर त्याला प्रेमात प्रत्युत्तर द्या.
स्वभाव शांत ठेवा.