फोर्ब्स ने भारताच्या 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विराट कोहली प्रथम क्रमांकावर आहे. यादी मध्ये प्रथमच खेळाडू प्रथम स्थानावर आहे. सलमान खान गेली तीन वर्षे यादीतील प्रथम क्रमांकावर होता. यावरून असे दिसते की भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली केवळ सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यासारख्या क्रिकेटपटू वरच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील सिने कलाकारांवर ही लोकप्रियतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. विराट कोहली ची कमाई 252 कोटी 72 लाख रुपये आहे. विराट कोहली लोकप्रियता व कमाई च्या बाबतीत फोर्ब्स यादी च्या पहिल्या स्थानावर आहे