डोरली येथील महादेव खिरडकर (वय 60) व पत्नी लक्ष्मी खिरडकर (वय 55) यांचा मृतदेह शेत शिवारातील गोठ्यात आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हे पती-पत्नी रात्रीच्या वेळी शेतात जागतिला जात असत. त्यांच्याकडे सात एकर शेती असून चार एकरात चना व तीन एकरात कपाशी लावलेली आहे. मंगळवारी सकाळी परिसरात दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली असून दोन दिवसांपूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त होत आहे.
त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी संबंध खूपच चांगले होते कोणाशी वादविवाद, भांडण नव्हते. आपल्या कामातच व्यस्त राहणाऱ्या या दोन्ही पती-पत्नीचा शेतशिवारात हत्या केल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे. त्यांच्या हत्येचे कारण काय असावे याचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हानच आहे.