त्याने कोयत्याने वार करून पत्नीचा केला निर्घुन खून


पिंपरी गुरव येथे सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास एक ह्रदय हेलावणारी घटना घडली. पत्नीला कामावरून येण्यास उशीर होत असल्याच्या रागातून स्वतःच्या पतीनेच कोयत्याने वार करून पत्नीचा खून केला .मृत झालेल्या महिलेचे नाव शैला लोखंडे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैला यांना कामावरून घरी येण्यास दररोज उशीर होत असे. यावरून सतत शैला व त्यांचे पती हनुमंत लोखंडे यांच्यात सतत वाद होत असत. अशाच प्रकारचे भांडण सोमवारी सकाळी दोघांमध्ये चालू होते, याच रागातून हनुमंत यांनी शैला वरती कोयत्याने वार करत  त्यांचा निर्घुण खून केला. पोलिसांनी  घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post