वातावरणातील सततच्या बदलामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात डबक्यांच्यात पाणी साचून मच्छर वाढीस लागतात. साचलेल्या पाण्यातून डेंगूच्या मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. हे मच्छर शक्यतो दिवसा चावतात. डेंगू मच्छर चावल्याने डेंगू आजार उद्भवतो.
डेंगू ची लक्षणे
१) रात्रीच्या वेळी जास्त ताप येणे
२) हातपाय, पाठ, डोके दुखणे
3) चक्कर येणे, मळमळ होणे,
४) शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होणे व शरीरातील ब्लड सेल्स घटने
डेंगू वरील उपाय
डेंगू आजार झाल्यावर ताप जास्त प्रमाणावर येतो. ताप येऊ नये ही खबरदारी पाळणे महत्त्वाचे आहे.
१) ताप येऊ नये यासाठी पॅरासिटामोल गोळी घ्यावी.
२) जास्तीत जास्त पाणी प्या यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
3) डेंगु झाल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात., प्लेटलेट वाढण्यासाठी पपईच्या पानांचा रस किंवा पपईचा ज्यूस दिवसातून चार-पाच वेळा घ्यावा
४) त्याचबरोबर तुळशीच्या पानांचा काढा ताप कमी करण्यास मदत करतो
५) गाईच्या दुधाचा चीक दही तसेच ड्रॅगन फ्रुट दिवसातून दोन-तीन वेळा खावी.
Tags:
Health