अण्णांच्या मौन व्रताचा आज सहावा दिवस

राळेगण सिद्धी: विविध मागण्यासाठी अण्णांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धी येथे ते मौन आंदोलन सुरू केले आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी. महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवर हेल्पलाईन ठेवावी अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन आंदोलन सुरु केले आहे.


अद्याप  सरकारकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. देशभरात दररोज दुष्कर्म च्या घटना घडत आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी नाहीतर अशा नराधमांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच राहील. दिवसेंदिवस देशभरात घडत राहणारे प्रकार दुर्दैवी असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post