सर्दी, नाक जाम होणे यावरती उपाय

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे सर्दी होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे नाक जाम होणे, डोके दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, नाकातून गरम वाफ येणे, ताप येणे, अशक्तपणा जाणवणे स्वाभाविकच आहे. सर्दी ही वातावरणातील बदलामुळे तसेच हवेतील धूलिकण यांच्या ऍलर्जीमुळे ही होऊ शकते.
 खालील उपायांमुळे सर्दी ला आराम मिळू शकतो
1) बाजरीच्या पिठाची धुरी घेतल्यावर सर्दी वर लवकरात लवकर आराम पडतो
2) ओव्याची धुरी घेतल्यावर सुद्धा सर्दीवर आराम पडण्यास मदत होते.
3)  झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिऊन थोडासा गुळ खावा
 या उपायांनी सुद्धा सर्दीवर आराम पडण्यास मदत होते
4) सर्दीमुळे कप झाला असेल तर तुळशीची पाने व आल्याचा कढा करून घेतल्यास आराम पडतो
5) तुळशीची पाने व काळी मिरी अधून मधून घेतल्यास सर्दी होत नाही तसेच दररोज प्राणायाम केल्याने सुद्धा सर्दीचा त्रास होत नाही

Post a Comment

Previous Post Next Post