मध्यरात्री रहस्यमय पद्धतीने कार ने दहा फूट पुढे जाऊन पेट घेतला
भीलवाडा जिल्ह्यात एक रहस्यमय घटना समोर आली आहे. भीलवाडा येथे मध्यरात्री मारुती कार ने रहस्यमय पद्धतीने पेट घेतला.
मध्यरात्री अडीच वाजता कारची हेडलाईट लागली, हॉर्न वाजायला सुरुवात झाली व गाडीने दहा फूट पुढे जाऊन पेट घेतला. सध्या पोलीस या आश्चर्यकारक घटनेचा शोध घेत आहे. कार चे मालक बंटी रेगर यांनी सांगितले की मध्यरात्री कार आपोआप चालू झाली, कारचा हॉर्न वाजला , लाईट लागली व कार दहा फूट पुढे जाऊन जळायला लागली. या रहस्यमयी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Tags:
India