शिवसेना सरकारचा सर्वात मोठा निर्णय - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंत चे कर्ज होणार माफ

   
      महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज होणार माफ. महात्मा ज्योतिबा फुले स्किम नुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार असून, कर्जाचा पैसा सरळ शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. ही स्कीम मार्च 2020 पासून लागू होणार आहे. विधानसभामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा केल्यानंतर अपक्ष पार्टी बीजेपी ने विधानसभा सदनाचा बहिष्कार केला. बीजेपी सरकारचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ केले पाहिजे. कर्जमाफीचा सरळ सरळ फायदा ज्यांनी 30 सप्टेंबर 2019 च्या आधी कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांसाठी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शिवसेना सरकारने पहिल्यापासूनच कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते.

Post a Comment

Previous Post Next Post