जोपर्यंत कुरान जाळले जातील तोपर्यंत नाटोत एन्ट्री नाही - एर्दोगान

     

जोपर्यंत कुरान जाळले जातील तोपर्यंत स्वीडन ला नाटोमध्ये सामील करण्याची मंजुरी देणार नसल्याचे तुर्कीचे राष्ट्रपति एर्दोगन यांनी सांगितले.त्याचबरोबर फिनलैंड च्या नाटो सदश्यात्वासाठी  एर्दोगन  तयार आहेत. 
बुधवारच्या संसद संबोधनात स्वीडन चा मुद्दा त्यांनी मांडला. 
    जोपर्यंत स्वीडेन मध्ये कुरान जाळले व फाडले जाईल तो पर्यंत स्वीडन नाटो मध्ये सामील होउ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.एर्दोगन म्हणाले प्रदर्शनकारीना स्वीडन पोलिसांनी अनुमती दिली असून जानेवारी मध्ये तुर्की दूतावासाबाहेर एका राजनेत्याने कुराण ची प्रत जाळली.त्यामुळे तुर्कीने या घटनेचा विरोध केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post