तिसर्या टप्प्यात श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे लस देण्यात येणार
जगामध्ये मागील वर्षपासून कोरोना सारख्या महामारीने थैमान घातलेले असून विशेषतः या रोगाला पूर्वीचा आजार असणारे व्यक्ती बळी पडत आहेत. या आजारावरील लसीकरण चालू झाले आहे. हा लसीकरणाचा तिसरा टप्पा असून यामध्ये ६० वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. या तिसऱ्या टप्प्यात देशाचे पंतप्रधान मा.मोदी साहेबांनी लस टोचून घेतली तसेच देशातील अनेक सन्मानीय व्यक्तींनी लस टोचून घेतली.
श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी मंत्री माननीय बबनराव पाचपुते यांनी सोमवारी तालुका आरोग्य केंद्रात जाऊन लस टोचून घेतली. जनतेने या महामारीच्या रोगास घाबरून न जाता धैर्याने सामोरे जा व शासनाचे नियम पाळा, मास्क वापरा,हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर ठेवा, असा संदेश यावेळी त्यांनी दिला.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, जि.प. माजी सदस्य सौ. प्रतिभाताई पाचपुते ता. भाजपचे माजी अध्यक्ष बाळासो महाडिक, आधी कार्यकर्ते व कर्मचारी हजर होते.