श्रीगोंदा: सध्याच्या काळात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. श्रीगोंदा तालुक्यातील भाजपा ओबीसी उपाध्यक्ष प्रतिक(दादा)बनकर यांनी See24News शी झालेल्या ऑनलाईन मुलाखतीत स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला जनतेला दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मित्रांनो, निधन वार्ता,भावपुर्ण श्रध्दांजली ची पोस्ट टाकायला सुध्दा हिम्मत होत नाही, अशी गोड-गोड माणसं आज आपल्यातून अचानक निघुन जात आहेत.माणसे निघून गेल्यावर काय दुःख होते ते आपण जाणतो. तरी सर्वांनी स्वतःची खुप काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, विनाकारण बाहेर फिरु नका, तोंडाला मास्क वापरा, स्वत:ला जपा, आपल्या घरच्यांना जपा, दवाखान्यात जावे लागेल अशी वेळ येऊ देऊ नका.
परिस्थिती खुप वाईट आहे आणि हाताबाहेर जात आहे. अगोदर फक्त पैसा नाही म्हणुन मनुष्य दवाखान्यात उपचारासाठी कमी पडत होता, पण आज दवाखान्यात जागा नाही. खुप पैसा असुन सुध्दा पैश्याची किंमत कवडी मोल आहे हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. पैसा असून सुद्धा आज दवाखान्यात रुग्णांना खाटा कमी पडत आहेत. ईच्छा असुनही जवळची व्यक्ती रुग्णाजवळ थांबू शकत नाहीये. इच्छा असूनही कोणाचा कोणाशी भेटण्याचा योग येत नाही. तरी आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.......
कोरोनाचे संकट वाढत आहे अशा परिस्थितीत घरात राहणे योग्य ठरेल.
मराठी बातम्या ताज्या, मराठी बातम्या लाइव, लोकमत ताज्या बातम्या, marathi news, आजच्या मराठी बातम्या, लोकमत पेपर मराठी, मराठी बातम्या ताज्या बातम्या मराठी बातम्या, मराठी मराठी, Marathi News Headlines, Live Marathi News, Latest Marathi News, Marathi News on Entertainment, Business, World, Sports, Politics, मराठी बातम्या, live मराठी बातम्या, Online marathi news headlines, Marathi Breaking News, Todays news in marathi