सावधान ! भारतात डिजिटल कंटेंट व सोशल मिडिया वापरकर्त्यांसाठी नवीन नियम

 देशात सोशल मिडीयाचा वाढता वापर पाहून त्यासंदर्भात नवीन नियम आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.त्या संदर्भातील नियम येत्या तीन महिन्यांच्या आत लागू होण्याची शक्यता आहे. यापुढे  सोशल मिडिया हाताळताना वापरकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा जेल किंवा दंड होऊ शकतो.



 नवी दिल्ली: सोशल मिडिया संदर्भातील नवीन नियम केंद्र सरकार पुढील तीन महिन्यात लागू करणार आहे. केंद्रीय मंत्री रघुशंकर प्रसाद यांनी गुरवारी याबाबत घोषणा केली आहे.यापुढे  सोशल मिडिया हाताळताना वापरकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा जेल किंवा दंड होऊ शकतो. 

 नियम  पुढील  प्रमाणे :-

  1. बेकायदेशीर कंटेंट २४ तासात  हटविण्यात  यावा. 
  2. संबंधीत  विभागासाठी नोडल  ऑफिसर, रेसिडेंट ग्रीवांस  ऑफिसर नियुक्ती  करावी. 
  3. या  व्यतिरिक्त  किती  गुन्ह्यांवर  प्रत्यक्ष कारवाही  झाली  याची  माहिती प्रत्येक महिन्याला देण्यात  यावी. 
  4. अफवा पसरवणारी  व्यक्ती  कोण  आहे. याची  तपासणी  करावी कारण  अशा  अफवा  सोशल मीडियाद्वारे  सहज  पसरतात. या  अफवेमुळे देशात  असुरक्षिततेचे  वातावरण  निर्माण  होते, लोकांमध्ये  अनेक  संभ्रम पसरतात, विदेशी  संबंध  प्रस्थापित  करणे कठीण होते. 
  5. हे  नियम  देशातील  प्रत्येक  नागरिकांसाठी असून  यामध्ये कोणत्याही क्षेत्रात  कार्य  करणाऱ्या  व्यक्तीला  लागू  होतील 
  6. इलेकट्रोनिक माध्यमांप्रमाणेच डिजिटल  माध्यमांना  चुकी  बद्दल  माफी  प्रसारित  करावी  लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post