बापानी स्वतःच्या मुलालाच जिवंत जाळले
हैद्राबाद: हैद्राबाद येथील कुकटपल्ली हौझिंग बोर्डमध्ये रात्री बापाने नशेत येऊन स्वतःच्या मुलाला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगा ६५% भाजलेला असून परिस्थिती नाजूक आहे. मुलाला अभ्यासाची सवय नाही या कारणामुळे बापाने असे पाऊल उचलल्याचे समजते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील आरोपी आर बालू याला चार मुलं आहेत. दोन मुली व दोन मुले, आर बालू सेक्युरेटी गार्डच काम करत आहे. त्याचा सगळ्यात लहान मुलगा रात्री नऊच्या सुमारास खेळून घरी आला व टीव्ही बघत होता.
यामुळे आरोपी बालु याने त्याला खूप मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगा ६५ टक्के भाजलेला होता. शेजारीराहत असलेल्या लोकांनी घटना स्थळी धाव घेतली.
आणि मुलाला घरातून बाहेर काढून नजीकच्या हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले असून मुलाची स्थिती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत