डब्ल्यू एच ओ चा अहवाल असे सांगत आहे की, धूम्रपान करण्याच्या बाबतीतही स्त्रियांनी आता पुरुषांना मागे टाकले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात हे सिद्ध झाले आहे की, जगभरातील महिला पुरुषांपेक्षा जास्त धुम्रपान करतात. धूम्रपान करणे हे शरीराला प्राणघातक असले तरी स्त्रियांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
गेल्या अनेक दशकांपासून धूम्रपान करण्याचे बाबतीत पुरुष नेहमीच पुढे होते, परंतु वेगवेगळ्या देशांकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त धूम्रपान करू लागल्या आहेत. भारतामध्येही महिला तंबाखू आणि धुम्रपान करण्याच्या बाबतीत पुरुषांच्या बरोबरीनेच आहेत.
धूम्रपान हा अरोग्यास हानिकारक असून धूम्रपान केल्याने कर्करोगाचा धोका संभवतो तसेच धूम्रपान केल्याने हृदय विकाराचा झटका व इतर संसर्गजन्य रोग होण्याचे प्रकारही समोर येत आहेत.
असे असतानाही सुशिक्षित स्त्रिया व पुरुष धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापर करताना दिसून येतात. डब्ल्यू एच ओ च्या अहवालानुसार धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे 80 लाख लोक दरवर्षी मरत आहेत.