पाच वर्षीय मुलावर अत्याच्यार


भद्रावती शहरातील  झिंगूजी येथे राहणारे मुलावर  येथे कामासाठी आलेल्या टाइल्स कामगारानी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या परिसरात खेळणाऱ्या दोन मुलांना या कामगाराने पतंग देण्याचे आमिष दाखवून एक कार्यालयाच्या पाठीमागे नेले व तिथे यातील पाच वर्षाच्या मुलावर अत्याचार केला. ही घटना संध्याकाळी पाचच्या दरम्यान घडली. या दोन्ही मुलांनी घरी आल्यावर आपल्या आई-वडिलांना झालेला प्रकार सांगितला. झालेला प्रकार कळताच आईवडिलांनी भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत व पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post