Okaya Faast ची 125 Km रेंजवाली EV स्कुटर लॉंच, अवघ्या 4 तासांत होणार फुल चार्ज..



Okaya EV ने Okaya Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. 125 Km च्या प्रभावी रेंजसह असलेली ओकाया फास्ट एफ -3  वाटरप्रूफ आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. या स्कूटरमध्ये अँटी थेफ्ट फीचर उपलब्ध आहे, त्यामुळे चोरी होण्याची शक्यता कमी आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमत आणि पॉवरबद्दल डिटेल्स मध्ये जाणून घेणार आहोत.. 

ओकाया फास्ट F3 किंमत :- 

किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, ओकाया फास्ट एफ- 3 ची किंमत 99,999 रुपये आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर ती मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाईटमध्ये उपलब्ध आहे.

ओकाया फास्ट F3 पॉवर आणि रेंज :- 

Okaya Fast F3 मध्ये 1200W ची मोटर आहे जी 2500W पॉवर जनरेट करते. या मोटरला पॉवर देण्यासाठी, 3.53 kWh Li-ion LFP ड्युअल बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी स्विच करण्यायोग्य टेक्नॉलॉजीसह येते, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते. रेंजबद्दल बोलायचं झालं तर, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 125 किमीची रेंज देते. स्पीडबद्दल बोलायचं झालं तर ती 70 ते 90 किमीच्या फुल स्पीडने धावू शकते. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात. कंपनी या स्कूटरच्या बॅटरी आणि मोटर सह 3 वर्षांची वॉरंटी देते. 

ओकाया फास्ट F3 मध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिवॉर्ड मोड आणि पार्किंग मोड आहे. या स्कूटरमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि बॅक साईडला हायड्रॉलिक स्प्रिंग शॉक एब्सॉर्बर आहेत. या स्कूटरमध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड आहेत. 

या स्कूटरमध्ये एक यूनिक व्हील लॉक फीचर्स आहे जे स्कूटर चोरीला जाण्याची चिंता दूर करते. कोणीतरी चोरण्याचा प्रयत्न केल्यास किंवा कोणीतरी या स्कूटरला ढकलण्याचा प्रयत्न केल्यास स्कूटर लॉक केली जाते तेव्हा व्हील आपोआप लॉक होतात ज्यामुळे चोरी करणे कठीण होते आणि बाईक अधिक सुरक्षित राहते.  

नव्याने लाँच झालेल्या Faast F3 वर भाष्य करताना, Okaya इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अंशुल गुप्ता म्हणाले की, Okaya Faast F3 ही एक पॉवरफुल इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जी भारतातील हाय क्वालिटी आणि विश्वासार्ह ईव्हीची मागणी पूर्ण करण्यासाठी सादर करण्यात आली आहे. हे मॉडेल युजर्ससाठी आरामदायी आणि सुरक्षित राइड प्रदान करण्यासाठी डिझाइन केलं गेलं आहे. 

हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि फीचर्ससह सुसज्ज आहे ज्यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. Faast F3 इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये गेम चेंजर ठरेल.. 

Post a Comment

Previous Post Next Post