हिवाळ्यात वजन कमी करणे किंवा नियंत्रित करणे खूपच अवघड गोष्ट आहे कारण बाकीच्या ऋतू पेक्षा या ऋतूमध्ये आळस खूपच असतो. थंडीमुळे कामाचा वेग सुद्धा कमी झालेला असतो व शरीराची हालचाल कमी होते तसेच थंडीत जेवण ही जास्त जाते. यामुळे वजन कमी करणे खूपच कठीण जाते तरी खालील काही उपायांमुळे वजन कमी करण्यास उपयोग होऊ शकतो.
१) हिवाळ्यात खूपच चटकदार पदार्थ खाऊ वाटतात. शक्यतो अशी चटकदार पदार्थ खाणे टाळा. मसालेदार अति तेलकट पदार्थामुळे वजन व शरीरातील चरबी वाढते. यामुळे असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे
2) हिवाळ्यामध्ये व्यायाम करणे चालू ठेवावे. सततच्या व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते तसेच व्यायाम केल्यामुळे शरीरातील चरबी व पोट कमी होते.
3) सकाळी सकाळी उठल्यावर गरम पाणी करून त्यात थोडे लिंबू पिळून घ्यावे यांनी सुद्धा शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
4 त्याचबरोबर सकाळी व संध्याकाळी जीरा ओवा बडीशेप यांचे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्यावे या उपायांनी वजन नियंत्रित राहण्यास व कमी होण्यास मदत होते