कान दुखी वरती आयुर्वेदिक उपचार

अनेकदा कानदुखी ही सर्दीमुळे सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर बाहेरील प्रदूषित वातावरण, वारंवार उडणारे धुलिकण याचा सरळ परिणाम कानावर होऊ शकतो. तसेच कानात माती, वाळूचे कण किंवा इतर कीटक गेल्याने ही कान दुखणे सुरू होते. किंवा कानावरती बाहेरच्या बाजूने मार लागणे, अति थंडी लागणे किंवा कानात पाणी जाने ही कारणे सुद्धा कान दुखी साठी कारणीभूत ठरू शकतात.

कान दुखी वरती आयुर्वेदिक उपचार
१) कानामध्ये कीटक, माती किंवा वाळूचे कण गेल्यास ती बाहेर काढावे व कानात थोडे कोमट तेल सोडावे यामुळे कान दुखी थांबते.
2)कानात मळ झाल्याने कान दुखी होत असेल तरी यावर सुद्धा कानात तेल घातल्याने कान दुखी थांबते.
३) कानात कीटक गेला असेल तर किंवा छोटा मुंगळा किंवा मुंगी गेली असेल तर स्वतःची लघवी  दोन-तीन थेंब कानात सोडावी,  कीटक बाहेर पडून कान दुखी थांबते.
४) कानात पाणी गेल्यास कान दुखत असेल तर तोंडातून हवा आत घेऊन नाक व तोंड दाबून हवा वरती ढकलण्याचा प्रयत्न करावा, कानातून हवा बाहेर येऊन सोबत पाणी बाहेर येईल व कान दुखायचा राहील किंवा समोरून कपाळावरती चापट मारल्याने सुद्धा कानातील पाणी बाहेर पडून कानदुखी राहते.

Post a Comment

Previous Post Next Post